कुरखेडा नगरातील विकास कामात आलेला रेतीचा अडसर शासनाने दूर करावा- नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांची मागणी

147

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

नगरपंचायत कुरखेडा चे वतीने संपूर्ण नगरात अंदाजे आठ ते दहा कोटी रुपयाची विकासाची कामे हाती घेण्यात आले
ली आहेत या कामांना जवळपास दोन महिन्या आधी कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत यामध्ये हे सांस्कृतिक सभागृह अंगणवाडी इमारत बांधकाम हनुमान मंदिर व व साई मंदिर देवस्थान सभा मंडप मार्केट परिसरातील सिमेंट व काँक्रीट रस्ते शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरातील विविध सीसी रोड इत्यादी कामाचा समावेश आहे ही कामे सुरू करण्याकरिता मुख्य घटक म्हणून रेतिचीआवश्यकता आहे जवळपासच्या रेती घाट बंद असल्याने रेती अभावी अद्यापही कामांना सुरुवात झालेली नाही ही सर्व कामे रखडलेली आहेत ही कामे पूर्ण करण्याकरता जवळपास अंदाजे 1000 ते 1500 ब्रास रेतिची आवश्यकता असेल यातील काही कामे सुरू न झाल्यास निधी परत जाण्याची संभाव्यता आहे वरील सर्व कामाकरिता कुरखेडा जवळील एखादा रेतीघाट मंजूर करून शासनाने संबंधित कंत्राटदारांना त्या कामाच्या अंदाजपत्रकानुसार नमूद असलेल्या रेतीच्या वाहतुकीला स्थानिक पातळीवर मा तहसीलदार यांचे कडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात यावा अशी मागणी नगरपंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी केली आहे• ही कामे सुरु झाल्यास लाकडाऊन च्या काळात स्थानिक मजुरांना कामे मिळून त्यांना रोजगार प्राप्त होईल व शाशनाला महसुल पण प्राप्त होइल,लवकरात लवकर नगरपंचायत परिसरातील कामे होऊन विकासाला चालना मिळेल•