नागपुरातील एका मंत्र्यांच्या गावात कोरोना चा उद्रेक; ७० वर्षिय व्रृद्धाचा कोरोना मुळे म्रृत्यु पशुसंवर्धन मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गेली हाताबाहेर-डॉ. राजीव पोतदार (भाजपा नेते)

282

 

पाटणसावंगी /नागपुर :४ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेले पाटणसावंगी गाव राज्यातील एका मंत्र्यांचे गाव असुन येथील कोरोणा ची स्थिति सध्या हाताबाहेर गेली आहे. काल एका ७० वर्षिय व्रृद्धाचे कोरोना मुळे निधन झाले. आतापर्यंत सापडलेल्या कोरोना पाँजिटीव रुग्णांची संख्या ४६ झाली आहे.
पाटणसावंगी येथील सद्भावना नगर सध्या कोरोना संसर्गाचे हाँट झोन बनले आहे. पाटणसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी कोव्हीड १९ च्या टेस्ट होत आहेत आणि दरदिवशी ५-६ कोरोना पाँजिटीव पेशंट आढळत आहेत त्यामुळे सध्या मंत्रीमहोदयांच्या गावातच कोरोना ची स्थिति हाताबाहेर गेली की काय? असे चित्र सध्या दिसत आहे. सावनेर तहसिलदार दिपक करांडे हे पाटणसावंगी क्षेत्रांवर अधिक लक्ष देऊन आहेत.

*पशुसंवर्धन मंत्री फक्तं पैसे कमावण्यात व्यस्त आहेत; त्यांचे ना तर कास्तकारांकडे लक्ष आहे ना कोरोनाकडे- डॉ. राजीव पोतदार (भाजपा नेते)*
पाटणसावंगी येथील कोरोना संकटावर प्रतिक्रिया देतांना भाजपाचे वरिष्ठ नेता डाँ. राजीव पोतदार यांनी दखल न्यूज भारत ला मोबाईल वर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, पशुसंवर्धन मंत्री नागपूर चे आहेत. कधी नव्हे ती सत्ता व त्यांना मंत्रीपद भेटले आहे, त्यामुळे ते सत्तेच्या मस्तीत आहेत. त्यांचे कास्तकारांकडे लक्ष नाही. दुधाकडे त्यांचे लक्ष नाही आणि त्यांच्या गावात पाटणसावंगी ला कोरोना चा उद्रेक आहे. तिथे पण त्यांचे दुर्लक्ष आहे.ते फक्त पैसे कमावण्यात च व्यस्त आहेत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती केवळ पशुसंवर्धन मंत्री यांच्या पाटणसावंगी तच नव्हे तर त्यांच्या संपुर्ण विधानसभा मतदारसंघात सध्या हाताबाहेर गेली आहे अशा स्पष्ट शब्दात भाजपा नेते डॉ. राजीव पोतदार यांनी यावेळी आरोप केला आहे.