मा. पालकमंत्री साहेब गडचिरोली जिल्ह्यात नेहमी वेळीअवेळी खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वासाळा सर्कल चे अभियंता यावर कारवाई करून विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन

135

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

वासाळा सर्कल येथील शेतकरी आता पावसाळा असूनही पावसाने दडी मारल्याने धानाला पाणी होत नसल्याने धान पिकांची खूप नुकसान होत आहे तसेच गर्मीचा उकाडा सुरू असल्याने जनताही खूप परेशान आहे , ज्यांच्याकडे विद्युत पंप आहेत त्यांचीही अडचण होत आहे कारण वासाळा सर्कल मध्ये नेहमी अनियमित वीज पुरवठा होत असल्याने वीजपुरवठा पंप ग्राहक तसेच घरगुती ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार याबद्दल वारंवार सर्कल अभियंता यांना सांगूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनियमित वीज पुरवठाची समस्या सुटत नाही ,अभियंता यांना फोन लावून विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देत असून भेट घेन्याचा प्रयत्न केला तर भेट सुद्धा होत नाही ,त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी यांना शेतीला विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असून पिकाची पाण्या अभावी नासाडी होत आहे तेव्हा सदर वासाळा सर्कल विज समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्युत अभियंता यावर कारवाई करण्यात येऊन नियमितपणे वीजपुरवठा सूर ठेवण्यात यावा अशी मागणी वजा विनंती प्रहार सेवक विकास धंदरे यांनी गावकर्यांच्या वतीने गडचिरोली चे पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे

विकास धंदरे
प्रहार सेवक वासाला ता आरमोरी जि. गडचिरोली