पारशिवनी येथे हॉटेल मालकासह तिघेजण आढळले कोरोनाबाधित

322

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी:-(ता प्र)सोमवारी पॉझिटिव्ह २०लोकाची टेस्ट तपासणी केली त्यात तिन कोरो णा बाधित आढळलेला व्यक्ती पारशिवनी येथील रहिवासी असून, हॉटेल व्यवसायीक आहे. लॉकडाऊन काळापासून हॉटेल व व्यवसाय घरी सुरू होते. बाजारातील हॉटेल बंद होताच घरी ग्राहकांची गर्दी उसळते. ३ ऑगस्ट रोजी दुपारनंतर ३ वाजेपर्यंत घरी व हॉटेलमध्ये जोरदार विक्री सुरू होती. मात्र, अहवाल येताच हॉटेल व घरची विक्री बंद केली. मात्र, असंख्य ग्राहकांच्या संपर्कात आल्याने त्याचा शोध घेणे कसोटीचे काम आहे. शहर व ग्रामीण भागात रुग्ण वाढतच असल्याने व्यापारी व अन्य यांच्या कोरोना तपासणीला गती आली आहे. त्या तपासणीत हॉटेलवाल्या रुग्णाचे दोघे भाऊ व अन्य एक असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
यामुळे पारशिवनी तालुका प्रशासन तहसीलदार वरुणकुमार सहारे, नगरपंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी, तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ, पोलिस निरीक्षक चव्हाण, नगराध्यक्ष कुंभलकर, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर,व नगर पंचायत चे कर्मचारी रुग्णाच्या घरी पोहोचले आणि परिसर सॅनिटाईज करून दोन्ही हॉटेल्स व घर सील करण्यात आले. आणि बाकी सदस्यांना होम क्वारंटाईन करून रुग्णांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय दवाखान्यात नागपूर पाठविण्यात आले. आणि उर्वरित कुटुंब व हॉटेल कर्मचार्‍यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. पारशिवनी शहरात हॉटेलमालक पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील हॉटेल शौकीनांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यावेळी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडून शहरातील जनतेला स्वत:ची काळजी घेण्यास आवाहन करण्यात आले व प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली.