Home कोरोना  आणखी तीन कोरोना पॉझिटिव आरमोरी होणार प्रतिबंधित क्षेत्र

आणखी तीन कोरोना पॉझिटिव आरमोरी होणार प्रतिबंधित क्षेत्र

1049

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी-दि 4 अगस्ट

प्रसूती नंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आणि आता पुन्हा तीन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ माजल्याचे दिसून येत आहे.
आरमोरी तालुक्यात आज दिनांक तीन ऑगस्ट ला आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथील एक तर स्थानिक आरमोरी शहरातील गायकवाड चौकातील एक व विठ्ठल मंदिर वार्डातील एक असे एकूण तीन व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह निघाले. कोरोना पॉझिटिव्ह निघालेले हे तीन व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आरमोरी येथे आपल्या स्वगावी आले होते .या तिन्ही व्यक्तींना आरमोरी येथील होस्टेल मध्ये संस्थात्मक विलगीकरनात ठेवण्यात आलेले होते .या तिघांचीही रिपोर्ट १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात असताना निगेटीव्ह आलेला होता . त्यानंतर यांची होस्टेल मधून दिनांक २१ जुलैला सुटका होऊन त्यांना होम कोरोनटाइन करण्यात आले.परंतु दिनांक २९ जुलैला आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या २ व्यक्तींचा अहवाल पाजीटिव्ह निघाला होता. या दोन व्यक्तींच्या संपर्कात आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथील व्यक्ती,व स्थानिक आरमोरी शहरातील गायकवाड चौक व विठ्ठल मंदिर वार्डातील हे तिन्ही व्यक्ती होते .त्यामुळे प्रशासनाने दिनांक ३१ जुलैला या तिघांना बोलावून फेरतपासणी केली असता या तिघांचाही अहवाल पाजीटिव आला. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली.
यापैकी विठ्ठल मंदिर वार्डात जो व्यक्ती कोरोना पाजीटीव्ह निघाला त्याची आई ही दिनांक २५ तारखेला मरण पावली. यावेळीं त्याच्या आईच्या मरणाला आरमोरी शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. सदर व्यक्ती कुनाकुणाच्या संपर्कात आला याची चौकशी सुरू आहे. आरमोरी शहरातील गायकवाड चौक व विठ्ठल मंदिर वार्ड दाट वस्तीचे असून शासनाने सदर एरिया तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात या संदर्भात जिल्हा स्तरावरून आदेश प्राप्त होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे.
तहसीलदार आरमोरी काय निर्णय घेतात या कडे लक्ष लागून आहे.

Previous articleआवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्याची मागणी
Next articleपारशिवनी येथे हॉटेल मालकासह तिघेजण आढळले कोरोनाबाधित