आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्याची मागणी

136

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील महत्त्वाच्या कोव्हीड विभागातील परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लागण सुरु असून आवश्यक विभागातील कर्मचाऱ्यांना मागणी प्रमाणे होम क्वारंटाइन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी आज एका निवेदनाआधारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात पुनसकर यांनी गेल्या पंधरा दिवसात केवळ अतिदक्षता विभागातील सुमारे आठ परिचारिकांना कोरोना लागण झाल्याची वृत्ते आहेत.संसर्गजन्य प्रसार रोखण्यासाठी सुरवातीलाच परिचारिकांना आलटून पालटून होम क्वारंटाइन करायला हवे होते असे नमूद करुन निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या आणि वयोमान झालेल्या कर्मचाऱ्यांना माणुसकी दृष्टिकोन बाळगून त्या कर्मचाऱ्यांना या आधीच विशेष सवलत द्यायला हवी होती असे म्हटले आहे.
या निवेदनात पुनसकर यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात यावी अशीही मागणी केली आहे.

*दखल न्यूज भारत