संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही यांचे निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे अनेक महिन्यांपासून तुटलेली संरक्षण भिंत त्याच अवस्थेत. ति संरक्षण भिंत उभी राहिल काय ?

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

शासकीय निधीतून सिंदेवाही पंचायत समिती चे सभोवती संपूर्ण जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले. त्याला वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु ग्रामिन पाणी पुरवठा उपविभागीय कार्यालयात जानाऱ्या रस्त्याला व म. ग्रा. रो. ह. यो. या कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजुनपर्यंत लोखंडी गेट लावन्यात आले नाही. त्यामुळे आत्ताच एका कर्मचाऱ्याची कार्यालयासमोरून मोटरसायकल चोरीला गेल्याची ताजी घटना आहे. पंचायत समिती चे मुख्य गेट ला (प्रवेश द्वार) लागूनच असलेले एक भलेमोठे झाड अती पावसामुळे संरक्षण भिंतीवर उन्मडून पडल्याने ती संरक्षण भिंतच तुटली असुन, त्याला अनेक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु कार्यालयप्रमुख या नात्याने संवर्ग विकास अधिकारी यांचे त्याकडे अजूनही लक्ष लागलेले दिसुन येत नाही. संवर्ग विकास अधिकारी दररोज तुटलेल्या संरक्षण भिंतीसमोरूनच जाने, येने करतात. परंतु त्याकडे त्यांचे पुर्णता दुर्लक्ष झालेले दिसते आहे. मुख्य गेटवरील तुटलेली संरक्षण भिंत व दोन्ही कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांना लोखंडी गेट लावन्याची खरी गरज आहे. कारण यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वा कामासाठी पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे वाहनांची चोरी होणार नाही. म्हणून याची खबरदारी संवर्ग विकास अधिकारी यांनी जातीने घ्यायला हवी. तसेच नागरिक घेऊन आलेल्या कामाचा वा तक्रारिंचा निपटारा करण्यासाठी कमितकमी वेळ लागेल, याची खबरदारी सुद्धा घेणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना आपल्या रखडलेल्या कामाचे वा तक्रारिंचे निरसन होन्यासाठी शेकडो दिवस वाट पाहण्याशिवाय पर्याय‌ नसतो, ती वेळ येऊ नये. धन्यवाद !