कोरोना वाढिसाठी केंद्र ‌सरकारच जबाबदार. ‌‌ ‌‌  ‌‌ सुधीर शिरपूरवार माजी सरपंच, गडबोरी.

0
123

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना रोगाची साथ सुरू झाली, याबाबत ची कल्पना केंद्र सरकारला होती. त्यानंतरही केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आमंत्रित केले. आणि सोबतच इतरही सार्वजनिक कार्यक्रम घेतल्यामुळे लोकांची गर्दी बघता, त्यावेळी कोरोनाची लागन कमी प्रमाणात होती. तेव्हा लॉकडाऊन जाहीर करने वा जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा लॉकडाऊन शिथिल करून, बाहेरून येणाऱ्या प्रवासी यांची सेवा सुरू ठेऊन, देशात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढविण्यात आला याला केंद्र सरकार जबाबदार आहे.
‌‌ तसेच केंद्र शासनाच्या धोरणामुळेच राज्यात व देशात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला त्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. असा आरोप श्री. सुधीर शिरपुरवार, माजी सरपंच- ग्रामपंचायत गडबोरी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर यानी केला आहे.