जुनी पेन्शन योजनेसाठी आमदार भास्कर शेठ जाधव यांना शिक्षक भारती कडून निवेदन

0
71

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारतीच्या राज्य संघटनेचे आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातील विधानसभेचे सदस्य व माजी मंत्री मा.आमदार श्री.भास्करराव शेठ जाधव यांचे चिपळूण येथे भेट घेऊन जुन्या पेन्शन योजना नाकारणारा दि 10 जुलैचा मसुदा रद्द करावा व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व आमदारांना शिक्षक भारतीच्या वतीने निवेदन देऊन सदर मसुदा रद्द करण्याची विनंती केली जात आहे.
शिक्षक भारतीच्या या मागणीला मा.आमदार भास्कर (शेठ) जाधव यांनी पाठिंबा देवून दि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुढील कारवाई करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांना मसुदा रद्द करण्याबाबत तात्काळ पत्र ही दिले व त्या पत्राची प्रत देखील संघटनेला सादर केली.
यावेळी रत्नागिरी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष श्री. सुभाषराव जाधव सर, चिपळूण तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे सर ,राजेश माळी सर ,खंडू नवले सर, लक्ष्मण गावित सर, भाऊ कांबळे सर आणि इतर शिक्षक मान्यवर उपस्थित होते.

दखल न्यूज भारत