संपादक जगदीश वेन्नम/रमेश बामनकर
गडचिरोली : पोलिस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सा.यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक श्री मोहित गर्ग सा.अप्पर पोलिस अधीक्षक श्री मनीष कलवानिया सा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल गायकवाड सा.यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने व महसूल विभागाच्या2सहकार्याने आदिवासी बांधवाना जात प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या “प्रोजेक्ट प्रगती” अंतर्गत उप पोलिस स्टेशन देचलीपेटा येथे दि.29/7/2020 रोजी नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने अतिदुर्गम भागातील मौजा कोंजेड गावातील 24 आदिवासी बांधवाना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी उप पोलीस स्टेशन देचलीपेटा प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल भुसारे, पोलिस उपनिरीक्षक श्री सुरेंद्र उपरे यांनी लाभार्थ्यांना जात प्रमानपत्राचे वाटप केले.
जात प्रमाणपत्रामुळे आदिवासी बांधवाना उच्च शिक्षण तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा लाभ घेता येणार आहे.वैयक्तिकरित्या जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अहेरी येथे तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय इ.ठिकाणी खेटे मारावे लागते.तसेच 4000 ते 5000 रुपये जाण्या-येण्यास खर्च होतात.
” प्रोजेक्ट प्रगती “अंतर्गत मौजा तोडका, मुखनपली, आसली, दोडगिर, कोंजेड या अतिदुर्गम भागातील 219 आदिवासी बांधवाना जात प्रमाणपत्र काढून वाटप करण्यात आले असून मौजा दोडगिर येथील 64 लाभार्थ्यांना लवकरच जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
देचलीपेटा हद्दीत नवीन प्रस्तावाकरिता उप पोलिस स्टेशन तर्फे कागदपत्रे गोळा करण्याचे काम चालु आहे.या कामी मा.उपविभागीय अधिकारी श्री गुप्ता साहेब, मा.तहसीलदार श्री ओंतारी साहेब, यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत लाभली आहे.उप पोलिस स्टेशन देचलीपेटा च्या सेवाभावी वृत्तीमुळे हद्दीतील लोकांच्या मनात पोलीस प्रशासनाविषयी सकारात्मक विश्वसाची भावना वाढीस लागली आहे.