Home गडचिरोली देचलीपेठा हद्दीतील 11 गावामधील 1315 शेळ्या-बकाऱ्याचे लसीकरण पूर्ण.. प्रभारी अधिकारी श्री...

देचलीपेठा हद्दीतील 11 गावामधील 1315 शेळ्या-बकाऱ्याचे लसीकरण पूर्ण.. प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार स्वतः ए.एस्सी.एग्री.(अँनिमल सायन्स) पदवीधर….

131

 

संपादक जगदीश वेन्नम/रमेश बामनकर

गडचिरोली : पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे साहेब यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक श्री मोहित गर्ग सा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री मनीष कालवानिया सा.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राहुल गायकवाड सा.यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन देचलीपेटा तर्फे नक्षलदृष्ट्या अती संवेदनशील व दुर्गम भागातील 11 गावामधील 1315 शेळ्या व बकाऱ्याचे लसीकरण “फुट अँड माऊथ डिसीज तसेच अथ्रेक्स” या रोगाची लागण होवून हद्दीतील 750 ते 800 शेळ्या-बकऱ्या दगावल्या होत्या.त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तेव्हापासून उप पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सा.पोलिस निरीक्षक श्री महादेव शेलार हे स्वखर्चाने हद्दीतील शेळ्या व बकाऱ्याचे लसीकरण करीत आहेत.
पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार साहेब स्वतः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मधून ए.एस्सी.एग्री (अँनिमल सायन्स)गोल्ड मेडिलिस्ट पदवी संपादन करून असल्याने त्यांनी ” आदिवासी बांधवा सोबत दिवाळी या कार्यक्रमात हद्दीतील गावोगावी जाऊन दिवाळी फराळ व कपडे वाटपासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक पशुपालन, बंदिस्त शेळीपालन, शेळी बकऱ्याना होणारे रोग व त्यांचे व्यवस्थापन, पशुसंगोपन व विक्री याचा ताळमेळ याबाबत मार्गदर्शन केलेले आहेत.
उप पोलिस स्टेशन ला आयोजित मेळावे तसेच कार्यक्रमादरम्यान प्रोजेक्टर व आधुनिक पशुपालन, बंदिस्त शेळीपालन याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पोलिस निरीक्षक श्री महादेव शेलार यांनी स्वखर्चाने फुट अँड माऊथ डिसीज तसेच अँथ्रेक्स या रोगावरील प्रतिबंधक लसी आणून खाजगी डॉ.श्री शंकर मूलकरी यांच्या साहाय्याने हद्दीतील 11 गावामधील 1315 शेळ्या-बकऱ्याचे लसीकरण पूर्ण केले आहे.परिणामी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही पावसाळ्यात एकही शेळी-बकरी दगावली जाणार नाही.पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार यांच्या अथक प्रयत्नांनी व उप पोलिस निरीक्षक श्री अनिल भुसारे, पोलिस निरीक्षक श्री सुरेंद्र उपरे यांच्या सहकार्याने हद्दीतील 1315 शेळ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याने गरीब शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येणार आहे.
या उपक्रमात जिमलगटा येथील पशुवैद्यकीय डॉ.श्री डोंगरे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.उप पोलिस स्टेशन या उज्वल कामगिरीमुळे हद्दीतील आदिवासी बांधवामध्ये गडचिरोली पोलीस दलाविषयी सन्मानाची, विश्वसाची व सहानुभूतीची भावना निर्माण करण्यात उप पोलिस स्टेशन देचलीपेटा चे अधिकार आणि कर्मचारी नक्कीच यशस्वी ठरले आहे.

Previous articleसिरोंचा भाजपचे युवक आघाडी तालुका अध्यक्ष – सागर मूलकला यांनी केली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल …
Next articleगोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांचे निधन