माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उत्साहात रक्षाबंधन  !

365

 

निरा नरसिंहपुर:दि.3 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंञी मा. हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण इंदापूरमध्ये भाग्यश्री बंगलो या आपल्या निवास्थानी सोमवारी (दि.3) उत्साहात साजरा केला.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांना सौ. चिञा कोरटकर, सौं. सुजाता बागल या बहिणींनी औंक्षण करून राख्या बांधल्या. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या बहिणींना ओवाळणी म्हणून भेटवस्तू दिली.प्रत्येक वर्षी हर्षवर्धन पाटील हे कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी बहिणींसमवेत रक्षाबंधनाचा सण साजरा करतात.

______________________________

फोटो:- माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांना राखी बांधताना भगिनी.

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160