भंडारा जिल्ह्यात आज 18 नवे रुग्ण, 7 रुग्णांना डिस्चार्ज

200

दखल भारत न्युज-साकोली तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
 पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 289
 बरे झालेले रुग्ण 214
 क्रियाशील रुग्ण 67
 एकूण मृत्यू 02
 संदर्भित रुग्ण 06
साकोली दि. 3 ऑगस्ट जिल्ह्यात आज 7 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 18 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 6, तुमसर 3, मोहाडी 7 व पवनी तालुक्यातील 2 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 214 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 289 झाली असून 67 क्रियाशील रुग्ण तर 6 संदर्भित रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 आहे