पेढी नदीच्या पुरात चारजण वाहून गेले, एकजण झाडाला अडकल्याने बचावला, एकाचा मृत्यू, दोघेजण बेपत्ता

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
वलगाव परिसरात काल जोरदार पाऊस झाल्याने पेढी नदीला आलेल्या पुरात आमला येथील चारजण वाहून गेले वाहून गेलेलीपैकी एकजण झाडाला अडकल्याने बचावला तर एकाच मृत्यू झाला असून दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत
आमला येथील विनायक कोरे, सतिश भुजाडे, पद्माकर वानखडे, अंकुश सगणे हि पेढी नदीच्या पुरात वाहून गेलेल्यांची नावे असुन काल दि 2 ऑगस्टला रात्री 11 वाजताच्या सुमारास हे चारहीजण आपल्या घरी पेढी नदीच्या पुलावरून जात होते पाऊस जोरदार झाल्याने पेढी नदीला पुर आल्याने चारहीजण पुरात वाहून गेले चोघांपैकी विनायक कोरे हे झाडाला अडकल्याने ते बचावले व बाहेर पडून गावात गेले व घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली
आज दि 3 ऑगस्टला सकाळी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले बचाव पथकास पुरात वाहून गेलेल्यापैकी अंकुश सगणेचा मृतदेह 500 मिटर अंतरावर सापडला तर दोघेजण सतिश भुजाडे व पद्माकर वानखडे अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेणे सुरु होते(वृत्त लिहिपर्यंत)
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजपूत, तहसिलदार संतोष काकडे, नायबतहसिलदार बडगे, ठाणेदार आत्माराम चोरमल यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे आमला गावात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे