काळी- पीवळी वाहन चालक मालकांची उपासमार (शहरातील बाजारात भीक मांगो आंदोलन) (खाजगी प्रवासी वाहतूकीला परवानगीची मागणी)

282

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
कोरोना मूळे मागील चार महिण्यापासून ( एकशे पस्तीस दिवसापासून)खाजगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने चालक मालक व त्यांचा कूटूंबावर उपासमारीचे संकट आलेले आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त चालक मालक संघटनेचा वतीने आज सकाळी शहराच्या बाजार पेठेत प्रतिकात्मक भीक मांगो आंदोलन करीत या गंभीर समस्येकडे शाशनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला
शाशनाने कोरोना या महामारीचा प्रसाराला अटकाव व्हावा याकरीता मागील जवळपास चार महिण्यापूर्वी देशात लाकडाउन घोषीत केला यावेळी काही जिवणाआवश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व सेवा व प्रतिष्टाने अनिश्चीत कालावधी करीता बंद करण्यात आले यावेळी प्रवासी वाहतूक ही सेवा सूद्धा बंद करण्यात आली होती मात्र टप्पा टप्याने काही अटी शर्तीचा अधीन जवळपास सर्व सेवा व प्रतिष्टाने पूर्ववत सूरू करण्यात येत आहे महामंडळाची बस सेवा सूद्धा जिल्हा अंतर्गत मर्यादीत स्वरूपात सूरू करण्यात आली आहे मात्र खाजगी काळी पीवळी प्रवासी वाहनाला परवानगी नाकारण्यात येत असल्याने वाहन चालक मालक व त्यांचा कूटूंबावर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे शाशनाने त्यांचा या गंभीर समस्येची दखल घेत जिल्हा अंतर्गत खाजगी प्रवासी वाहतूकीला परवानगी द्यावी या मागणी कडे शाशनाचे लक्ष वेधण्याकरीता‌ आज कूरखेडा-वडसा काळी पीवळी खाजगी प्रवासी वाहतूक संघटनेचा वतीने शहराचा बाजार पेठेत प्रतिकात्मक भीक मांगो आंदोलन करण्यात आले याप्रसंगी संघटनेचे नासीर खान,शाम थोटे, नासीर शेख, सचिन पंडीत,बाबा सय्यद भास्कर मसराम सोहेल शेख हंसराज रक्षे शकील शेख अतूल डहाळे शब्बीर पठान सूनिल नेवारे रियाज़ शेख गूड्डू राठी नईम शेख लक्ष्मन मेश्राम किशोर उईके धर्मा उईके पुरषोत्तम जनबंधू शैलेश कोटांगले खेमराज नाकाडे होमराज गायकवाड़ बाबा शेख शाहरुख सय्यद गोलू शेख लियाकत सय्यद आदि उपस्थित होते