फ्रीडम टॅलेंट ॲकेडमी ग्रुप साकोलीने साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम

दखल भारत न्युज
साकोली तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
(३ऑगस्ट)
साकोली-येथील फ्रीडम टॅलेंट ॲकेडमी ग्रुपने सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,व पोलिस कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.
“कोरोना योद्धा माझे रक्षक”हि संकल्पना घेऊन आज साकोली येथे ठिकठिकाणी जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला.यावेळी कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ बडवाईक, पोलिस निरीक्षक मडावी, नगरसेवक मनिष कापगते,F.T.Aग्रुपचे अध्यक्ष किशोर बावने,श्री.संप्रदाय सेवा केंद्राचे सौ.निकीता येवले उपस्थित होते.तसेच रूपाबाई आंबेडारे,निलीमा कोडापे, अंजली ईन्कने, सविता वालदे,श्रुती राऊत, तनिषा वालदे व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.