गृहमंत्री अमित शहा कोरोनातून बरे व्हावे व त्याच्या स्वास्थ्यलाभासाठी काशी विश्वनाथबाबा मंदिरात महाआरती.

144

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे)

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दि.2 ऑगस्ट रोजी त्यांनीच ट्विट करून कळविले आहे. या आजारातून त्यांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी,त्यांना उत्तम स्वास्थ्य प्राप्त होऊन दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून दि.3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 :00 वाजण्याचे सुमारास भाजपाचे युवा नेते अॅड.रमण जायभाये व तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येवूतकर यांच्या हस्ते मातृतीर्थ तलावा जवळील काशी विश्वनाथबाबा मंदिरात महापूजा मांडून महाआरती करण्यात आली.
गृहमंत्री अमित शहा यांचेवर सध्या दिल्लीच्या वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. या आजारातून त्यांची लवकर मुक्तता व्हावी, त्यांना सुदृढ़ व दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून मातृतीर्थ तलावा लगत असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरात श्री रेणुकामाता,श्री दत्तप्रभू व काशीविश्वनाथ बाबांची महापूजा मांडून महाआरती करण्यात आली.या विधीचे पौरोहीत्य वे.शा.सं.विजय आमले,बालाजी महाराज समुद्रे,अनुदिप कोरटकर व प्रशांत जहांगीरदार यांनी केले.यावेळी श्रीपाद भोपी जहांगीरदार, पद्मजा गी-हे,संजय पेंदोर,राजू दराडे,बळीराम परसवाळे यांचेसह अनेक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.व अमित शहा यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.