अर्जुनीमोर येथील शिक्षक कॉलोनीत आढळला डेंग्यूचा रुग्ण

107

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

अर्जुनीमोर– अर्जुनी मोरगाव नगरपंचायत हद्दीतील शिक्षक काॅलनीत डेंग्युचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासन सजग झाले आहे.सध्या तालुक्यात कोरोना रुग्णांचीही संख्या वाढत असतांनाच डेग्युचा रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्जुनी येथील प्रभाग अकरा मधील 14 वर्षीय मुलाला डेंगू झाल्याचे निष्पन्न होताच प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे यांनी परिसराताली नागरिकांना आरोग्याची काळजी व स्वच्छतेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.