मुनघाटे महाविद्यालयात वृक्षाला राखी बांधून वृक्ष संगोपनाचा केला संकल्प

165

 

धानोरा/भाविकदास करमनकर

स्थानीक, धानोरा येथील श्री. जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रासेयो विभागातर्फे झाडाला राखी बांधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विणा जंबेवार तसेच रासेयो विभाग प्रमुख डॉ सोनाली ढवस सहकार्यक्रम अधिकारी प्रा.ज्ञानेश बनसोड आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक वॄंद हजर होते.यावेळी पर्यावरण संरक्षण आणि वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याचा सामुहिक संकल्प करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा ज्ञानेश बनसोड तर आभार डॉ सोनाली ढवस यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.