कुंभा ग्रामवासीयांतर्फे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना व अपंग वृद्धांना जीवनावश्यक (किट)चे वाटप

0
136

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव : जगामध्ये कोरोना वायरस ने थैमान घातले असता यातच यवतमाळ जिल्यातील मारेगाव तहसिल कोरोना मुक्त होता. परंतु राजुर (कॉलरी ) येथील पोझिटिव्ह महिलेच्या संपर्कामध्ये आलेला कुंभा येथील एक पुरुष शनिवारी पोझिटिव्ह आढळला. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ खबरदारी म्हणुन कुंभा येथील प्रभाग क्र.2 सील करण्यात आला. सील करण्यात आलेल्या परिसरातील नागरिकांना बाहेर जाता येत नसल्यामुळे त्यांचा पुढे मोठी समस्या निर्माण झाली, आमच्याकडे कुणाचे लक्ष केंद्रित होईल कोण आम्हाला मदत देईल अशी आशा बाळगत असता गावकऱ्यांनी
रविवारी 6;00 वाजता कुंभा गावातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामधील भागात जे आठ दिवसापासून पूर्णतः बंद आहे.

तिथे दैनंदिनी जीवनावश्यक किराणा, भाजीपाला व अन्नधान्य किटचे कोणताही गाजावाजा न करता वाटप करण्यात आले. व खऱ्या अर्थाने गरजवंताला ह्या कोरोना च्या महामारीत मदतीचा हात दिला. कुठलिच अपेक्षा न ठेवता व कुठलाच स्वार्थ न ठेवता त्यानी जे कार्य केले त्यावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे आभार मानले. व आपलूलकीची भावना व्यक्त केली. मात्र त्या प्रतीबंधीत क्षेत्रातील नागरिक स्थानिक प्रशासनावर चांगलेच आक्रमक झाले.