Home सोलापूर आ. प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते  प्रभाग ४ मधील ७ कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्रे...

आ. प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते  प्रभाग ४ मधील ७ कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्रे प्रदान सभापती विक्रम शिरसट यांच्या पाठपुराव्याला यश

150

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गुरुप्रसाद कुलकर्णी

पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे व स्व.बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी १८ कमर्चाऱ्यांना आ.प्रशांत परिचारक यांच्याहस्ते अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ४ मधील ७ कर्मचाऱ्यांच्या समावेश असून यासाठी बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने प्रभागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.          या बाबत सभापती विक्रम शिरसट यांनी दिलेल्या अधिक नुसार पंढरपूर नगर पालिकेकडील आरोग्य विभागातील १८ कामगारांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या प्रलंबित होत्या.यापैकी प्रभाग क्रमांक ४ मधील ७ वारसांना नियुक्तीची प्रतीक्षा होती.अखेर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे व स्व.बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ४ मधील विनोद हनुमंत साळवे, माउली मुरलीधर वाघमारे, गणेश मच्छिंद्र नाईकनवरे, अण्णा विष्णु लोंडे, रोहित बापू बंगाळे, शुभम चंद्रकांत साबळे, ओमकार जनार्दन वाघमारे यांच्यासह शहराच्या विविध भागातील १८ वारसांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, मुख्याधिकारी अनिकेत मोनारकर, बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, संजय निंबाळकर, कृष्णा वाघमारे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर आदीच्या हस्ते देण्यात आल्या.

Previous articleट्रक रस्ता दुभाजकावर चढला वाहनातील तांदूळ गायब?
Next articleकुंभा ग्रामवासीयांतर्फे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना व अपंग वृद्धांना जीवनावश्यक (किट)चे वाटप