Home अमरावती ट्रक रस्ता दुभाजकावर चढला वाहनातील तांदूळ गायब?

ट्रक रस्ता दुभाजकावर चढला वाहनातील तांदूळ गायब?

170

सुयोग टोबरे / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
चांदूरबाजार :- अंजनगाव सुर्जीहून परतवाडा मार्गे चांदूर बाजारात येत असलेला तांदळाने भरलेला ट्रक जमापूर फाटाजवळ रस्ता दुभाजकावर चढला. यात ट्रकमध्ये असलेला तांदूळ रस्त्यावर सांडले. मात्र, ट्रकचालक घटनास्थळाहून फरार झाची माहिती पोलिसांनी दिली.
चांदूरबाजार शहरापासून परतवाडा मार्गावर अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या जमापूर फाट्याजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास एक ट्रक रास्ता दुभाजकावर चढला. सदर ट्रक क्रमांक सी जे १२ यस ०६९३ असून हा ट्रक अंजनगाव सुर्जी येथून शहराकडे येत असल्याची माहिती आहे. दुर्घटनेवेळी या ट्रकमध्ये तांदळाचा साठा असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. रात्री ११ वाजता दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे बघितल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या ट्रकमध्ये कोणत्याच प्रकारचा माल होता की नाही, याची पाहणी केली नसल्याचे सांगितले. त्या ट्रकमधून रातोरात माल खाली करण्यात आला. यात काही तांदूळ घटनास्थळीच पडून होते. यावरून ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र पोलिसांचा केलेल्या चौकाशिवर संशय निर्माण होत आहे.
आरोप तस्करीचे रॅकेट
सदर ट्रकमध्ये शासकीय तांदूळ असल्याची शंका आहे. अंजनगाव सुर्जीतील एक कुख्यात धान्य तस्कराने चांदूर बाजार येथील एका तस्करच्या माध्यमातून तांदूळ रफादफा केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी वेगळीच भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील तांदूळ तस्करीचे रॅकेट दाबले गेल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.

सदर घटनेप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात येणार आहे. तसेच ट्रकमध्ये माल होता. की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही.
– उदयसिंग साळुंके, पोलीस निरीक्षक

Previous articleआरमोरी उपजिल्हा रुग्णालयात खळबळ प्रशासन लागले कामाला प्रसूती नन्तर महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह
Next articleआ. प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते  प्रभाग ४ मधील ७ कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्रे प्रदान सभापती विक्रम शिरसट यांच्या पाठपुराव्याला यश