आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात खळबळ प्रशासन लागले कामाला प्रसूती नन्तर महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह

1504

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी :-दि 3अगस्ट- आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती च्या दोन दिवसानंतर एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार 31 जुलै रोजी मध्यरात्री च्या दरम्यान प्रसूतीसाठी एक महिला भरती झाली व भरती झाल्यानंतर अवघ्या तीस मिनिटात तिची प्रसूती झाली.
दरम्यान काल 2 ऑगस्ट रोजी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या सर्व पेशंटची रॅपिड औटीजोन तपासणी करण्यात आली. दरम्यान सदर महिला पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने रुग्णालयात खळबळ माजली ही महिला 13 जुलै रोजी कोरेगाव येथे होती अशी माहिती प्राप्त झाली. सदर महिला कोरोना पॉझिटिव निघाल्याने ज्यांनी प्रसूती केले ते डॉक्टर व परिचारिका सोबतच प्रसूतीनंतरच्या दोन दिवसात या महिलेचा ज्यांच्याशी संपर्क आला त्यांचा स्क्रब घेऊन तपासणी सुरू केली तसेच या महिलेची गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे.
यासंदर्भात आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.परमानंद बनसोड यांनी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी विशेष गरज असेल तर यावे सोबत सोशल डिस्टन्स पाडावे, मास्कचा वापर करावा व गर्दी करु नये असे आवाहन केले आहे.
डाँ.ठिकरे यांचेशी संपर्क साधला असता कळले की सदर महिला कोरोना पाझिटिव्ह असल्याचे म्हटले तसेच पोलीस निरीक्षक दिगम्बर सूर्यवंशी यांनी ही त्याच कामात व्यस्त असल्याचे बोलले.