हिंमतीला दाद द्यावी लागेल, ” ती एक जुनी म्हण आहे. हिंमत करल तो जुव्वा जिंकल” त्याप्रमाणे मुरूम चोरट्यांनी राज्य महामार्गावर ‌दिवसा ढवळ्या जे. सि. बि. ने उत्खनन करून केली गेली मुरूमाची चोरी. तरीही संमंधीत विभाग अनभिज्ञ.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, नागपूर महामार्गावर सिंदेवाही पासुन अवघ्या तिन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर, दिवसा ढवळ्या राज्य महामार्गावरून‌ गौणखनिज मुरूमाची चौरी शातीर चोरच करू शकतो. कारण त्याचे हिंमतीला दाद द्यावीच लागेल.
सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाहीचे समोरील मेंढा (माल) गावाचे शेतशिवार व महामार्गाला लागूनच लागूनच मुरूम असल्याचे चोरट्यांनी हेरून, दिनांक ३१/७/२०२० व १/८/२०२० रोजी शासकीय सुटीचे दिवसाचा व बकरी ईदच्या सनाचा फायदा घेत, मुरूम चोरांच्या कामगिरीला सुरूवात झाली. त्याने जे. सि. बी. मशिनद्वारे मुरूम खोदून दोन ट्रकांमधून मुरूम चोरीची कारवाई सुरू केली. महामार्गाने वाहनाने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षात मुरूम चोरीची बाब लक्षात न येण्याचे कारण असे की, रोखण्यासाठी रोडचे रुंदिकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी बंद झाल्याने, आता रुंदिकरणाचे काम सुरू झाले असावे असा महामार्गाने ये, जा करणाऱ्यांचा गोड गैरसमज झाला. पण तो प्रकार तसा नसून चोरीचा असल्याचे लक्षात आल्याने मुरूम चोरट्यांचे माथे ठणकल्यामुळे त्यांनी मुरूमाने भरलेले दोन ट्रक आणि जे. सि. बी. मशीन‌ महामार्गावरून आडमार्गाने खातगांवचे दिशेने मुरूम भरलेले दोन ट्रक उभे केले. आणि जे. शि. बी. मशीन रोडचे खाली उतरवून तिथे असलेल्या पळसाचे झाडांचे मध्ये लपविण्यासाठी ठेवून जे. शि. बी. चा ड्रायवहर मशिन सोडून पळसगांव (जाट) चे दिशेने निघून गेला. नंतर सिंदेवाही राजस्व निरीक्षक चिडे आणि सिंदेवाही तलाठी पंचभाई यांनी पंचासमक्ष पंचनामा करून, मुरूम भरलेल्या दोन्ही ट्रक, क्रमांक- एम. एच. ३१, डब्ल्यु. २९६५ व एम. एच. ३१, डब्ल्यु. ४२१५ हे दोन्ही वाहन सिंदेवाही तालुका कार्यालयात जमा केल्या गेले. कांही वेळाने जे. सि. बी. चा ड्रायव्हर ठिकाणावर पोचून, जे. सि. बी. मशीन पळवून तळोधीचे मार्गाने घेऊन गेला असल्याचे प्रत्यक्ष बघायला मिळाले.