Home Breaking News युवारंग तर्फे नगरपरिषद ला निवेदन पाणी पुरवठा योग्य न झाल्यास युवारंग चा...

युवारंग तर्फे नगरपरिषद ला निवेदन पाणी पुरवठा योग्य न झाल्यास युवारंग चा आंदोलनाचा इशारा

194

 

रोशनी बैस
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 3 अगस्ट- शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथील नागरिकांना नळाच्या पाण्यासाठी मागील बऱ्याच वर्षापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर वार्डातील नळाची पाईपलाईन ही २ इंचची असून यामधून फक्त २० ते ३० मिनिट पाणी नळ ग्राहकांना मिळतो त्यातच एक दिवसा आड नळाचे पाणी सोडल्या जाते त्यामुळे ग्राहकांना मुबलक पाणी मिळत नाही याबाबत माननीय नगरसेवक व माननीय पाणीपुरवठा सभापती यांना वारंवार तक्रार व निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे या गंभीर समस्येचे माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद आरमोरी यांनी लवकरात लवकर निराकरण करावे अन्यथा युवारंग तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल .
पाणी पुरवठा सभापती विलास पारधी यांना वारंवार कळवूनही काना डोळा केल्याने तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असे युवरंग च्या कार्यकर्त्यांनी कळविले आहे.

Previous articleहक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार
Next articleआदिवासी समाजाचे आधुनिक शिक्षण…..! -श्री.एम.सी.बेडके, प्राथमिक शिक्षक.