मोटरसायकल गेली चोरीला. सिंदेवाही पंचायत समिती चे अॉफीसचे समोरून दिवसा ढवळ्या लांबवीली चोरट्यांनी.

142

चंद्रपूर जिल्हा
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही परिसरातून भुरट्या चोरांकडून चोरीच्या अनेक घटना, उघडकीस आल्या आहेत. त्यात साईकल चोरी, रात्रीला पान‌ठेले फोडून केलेली चोरी अश्या छोट्या, मोठ्या घटना घडत असतात. आणि उघडकीस पण आल्यात. परंतु महिन्याचे शेवटी म्हणजे ३१ जुलै २०२० ला पंचायत समिती सिंदेवाही येथे एम. आर. इ. जि. एस. या विभागात कार्यरत कर्मचारी मंगेश विश्वनाथ इंदुरकर हे नेहमीप्रमाणे सहकारी कर्मचारी यांचे गाडीसोबत आपली हिरो कंपनी ची निळ्या रंगाची गाडी स्प्लेंडर प्रो. क्रमांक- MH 34- AU- 1252 ही बचतगट कार्यालयासमोर गाडी ठेवून आपले कार्यालयीन काम करत होते. कार्यालयासमोर कुनीही नाही याचा फायदा घेत, अज्ञात चोरट्यांनी सदर ची बाईक दुपारी अंदाजे १-३० ते २-२० चे दरम्यान चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने बराच वेळ शोधाशोध केली. परंतु गाडी न मिळाल्याने सायंकाळी पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली. फिर्यादिचे तक्रारीवरून अप. क्र. ३७९/२०२० प्रमाणे भा. द. वि. चे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत असल्याचे पोलीस सुत्रांनुसार कळले.