Home गोंदिया नर्सिंगच्या विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणात दोषीवर कारवाई होणार -शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे

नर्सिंगच्या विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणात दोषीवर कारवाई होणार -शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे

168

 

प्रतिनिधी बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

गोंदिया,दि.०२/०८/२०२०:
येथील शासकीय नर्सींग महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनीला परिक्षा संपल्यानंतरही सुट्टी न देता रुग्णालयात कोरोनासंसर्गाचे कारण पुढे करुन कार्यरत ठेवणारे आणि तिच्या बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणारे नर्सींगचे प्राचार्य सहारे व मॅटर्न यांच्यावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही,तोपर्यंत शिवसेना थाबंणार नसल्याची भूमिका जिल्हाअध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी घेतली आहे. येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातंर्गच्या शासकीय नर्सींग विद्यालयात नर्सिंगच्या तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम करीत असलेल्या शुभांगी गजानन बांगरे(वय२२) या विद्यार्थीनीला व्यवस्थित उपचार न मिळाल्याने आणि आजारी असताना तिला रुग्णालयात कार्यरत ठेवल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारला घडली. त्यानंतर नर्सिगंच्या विद्यार्थीनीनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करुन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांच्यासोबतच एनएसयुआय आणि युवाओ की आवाज या संघटनेने सुध्दा सहभाग घेतला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी रुग्णालयात पोचून आंदोलक विद्यार्थींशी चर्चा केल्यानंतर अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांच्याशी चर्चा करीत सर्व पत्रव्यवहार लगेच मुंबईला करुन कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर रुखमोडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन प्राचार्य सहारे विरुध्द पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश देत पाच सदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे जाहिर केल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Previous articleआकाशझेपने रक्तदानातून दिला मैत्रीचा संदेश
Next articleमोटरसायकल गेली चोरीला. सिंदेवाही पंचायत समिती चे अॉफीसचे समोरून दिवसा ढवळ्या लांबवीली चोरट्यांनी.