कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर
पाराशिवनी(तालुकाप्रतिनिधी): कोरोनाच्या जागतिक संकट काळात शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना निःशुल्क रक्तपुरवठा करण्याच्या उदात्त हेतूने आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील जय हनुमान सेवा समिती परसोडी (पेठ) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक मैत्री दिनानिमित्त परसोडी येथे आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले. याप्रसंगी परिसरातील ३० तरुणांनी रक्तदानातून सामाजिक समता, बंधुता व मैत्रीचा कृतिशील संदेश दिला. कोरोनाचे भय न बाळगता रक्तदान करून मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग दिल्याबद्दल आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांचे हस्ते रक्तदात्यांना ‘कोविड योद्धा गौरव’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रस्तुत रक्तदान शिबिरात राजेश कुंभलवार, गंगाधर सहारे, दर्पण बुरडे, अतुल दुनेदार, सचिन सांडेल, संपत तीळग्राम, प्रमोद बोरडे, निलेश वाघमारे, जितेंद्र भुरे, महादेव धार्मिक, रीना वाढवे, प्रफुल भुरे, घनश्याम उकेपेठे, संदीप दरवई, आशिष टेकाम, विलास देशमुख, नितेश ढोंगे, अश्विन भरणे, शालिक तीळग्राम, शुभम दुपारे, रतन कोरडे, सदानंद बगमारे, रोहित इंगळे, राहुल ढोंगे, संजय दिवटे, मंगेश खंडाळे, प्रशांत तुरणकर, जगदीश कावळे, अमोल उईके, सतीश राऊत यांनी रक्तदान केले. याप्रसंगी आयजीएमसी रक्तपेढी नागपूरच्या बीटीओ डॉ. पल्लवी, चेतन मेश्राम, वंदना भगत, दिपक गजभिये, सुदेश, गुलाब व चमूने उत्तमरित्या रक्त संकलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाशझेपचे अभय चकबैस, शुभम मिसार, प्रशांत तुरणकर, रजनी मोरेश्वर दरवई, मोनाली दुनेदार, रवींद्र राऊत, यांनी अमूल्य योगदान दिले. अभय चकबैस यांनी समस्त उपस्थितांचे आभार मानले.