Home कोरोना  अदानी विज कारखाना बनत चालले ; कोविड रुग्ण कारखाना तरीपण नेमके प्रादुर्भाव...

अदानी विज कारखाना बनत चालले ; कोविड रुग्ण कारखाना तरीपण नेमके प्रादुर्भाव करणारा कोण, हे अद्याप बेपत्ता, विरष्ठ अधिकारी, कर्मचारी सुस्त अदानी कामगाराने ने केले ३७ कोविड बाधीत अखेर मुंडीकोटा वैद्यकीय अधिका-याची समयसुचकता, सतर्कता उपयोगी

256

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी

तिरोडा : तिरोडा येथे अदानी विजनिर्मान महाराष्ट्र लिमिटेड कारखाना आहे. विजनिर्मान कारखाण्यात परप्रांतातील नागरिक आहेत.
तिरोडा व परिसरातील खेड्यामधील ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कामगार-मजूर कारखाण्यात ये-जा करतात.

तिरोडा तालुक्यात व परिसर गावखेड्यात वास्तव्य करणारा कोणीही कोविडचा बाधीत नाही. जेव्हा पर्यंत परप्रांतातील कोविड बाधितसी त्यांचे संपर्कात येत नाही. तोवर गावखेड्यातील कामगार बाधीत होत नाही.

परप्रांतातील कोरोना बाधित केडी कार्पोरेसन की नेमका अदानी विजनिर्मान कारखान्यात कोण व कोठे ? हे नेमके माहीत नाही.

मुंडीकोटा येथिल अदानी विजकामगार नागरिक कोविड ग्रसित असल्याचे निश्चित झाले होते. यामुळे मुंडीकोटा येथील कामगार ज्यांच्या संपर्कात होता. त्या २३ कामगारांसह अदानी मधील अन्य १० सह ५१ संशयितांचे स्व्याब परिक्षणाकरिता घेण्यात आले. यापैकी ३७ संशयित परिक्षणार्थी यांचा अहवाल सकारात्मक आहे.

आता तिरोडा तालुक्यात अदानी कारखाना हेच कोविड १९ चे प्रादुर्भाव पसरविण्याचे एकमेव कारखाना बनत असून तेच खुले असल्याने कोविड १९ चे जणू स्फोट कारखाना करणार काय ? यासह अदानी कारखाण्यात नियम धाब्यावर बसवून कार्य तर केले जात नाही ना ! अश्या शंका व्यक्त होत आहे. याचा परिणाम तिरोडा व परिसरातील गावखेड्यातील कामगारासह गावची गाव चपेटमध्ये येणार असल्याचे वृत्त आहे.

शासन-प्रशासन अदानी कारखान्यासाठीच हतबल का? हा संशोधनाचा विषय बनत आहे. हतबलतेचे हे धोरण कोविड १९ चे रोखथांब करण्यास मारक ठणारे असून संबंधितांनी उपाययोजना करून योग्य पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

अदानी येथे काम करणाऱ्या सर्वांचे आरटीपीसीआर नमुना परिक्षणास पाठविल्याशिवाय कोविड १९ चे रोखथांब वर आळा बसणार नाही.

मुंडीकोटा व परिसरातील १२ परिक्षणार्थींचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६ नमुने सकारत्मक आले आहेत. यात पांजरा गावाचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे बाधितांची संख्या इतर गाव खेड्यात वाढण्याचा कयास लावला जात आहे.

अदानी वीजनिर्मिती महाराष्ट्र लिमिटेड येथील केडी कार्पोसन मधील २३ कामगारांचा नमुना परीक्षनास पाठविण्यात आले होते. यापैकी २१ कामगारांचा अहवाल कोविड १९ सकारात्मक असून १ कामगारांचा परीक्षण नकारात्मक मिळालेला आहे. तर एकाचे पुनर परीक्षनासाठी पाठविण्यात येणार आहे. यातीलच १० जनांच अहवाल कोविड रुग्ण बाधीत असे एकूण ३७ रुग्ण अदानी कामगाराने तयार केले असून ही आकडेवारी वाढतच जाणार असल्याने अदानी वीज कारखाना की कोविड १९ कारखाना असा सवाल व्यक्त केला जात आहे.

*मुंडीकोटा वैद्यकीय अधिकारी यांचे सतर्कता व समयसुचकता उपयोगी आली*

कोविड १९ चे अँटीजन तपासणी ऐवजी आरपीटीएस तपासणी व्हावी तर अदानी कामगारांची आरटीपीसीआर तपासणी स्व्याब हे तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात न घेता त्यांचे नमुने आयटीआय येथेच स्वतंत्र ठिकाणी घेण्यात यावे. या आग्राहाने, तसे केल्याने कोविड १९ चे प्रादुर्भाव रोखथांब करण्यास आळा बसला आहे.

अदानी हे वीज कारखाना की कोविड १९ प्रादुर्भावाचे कारखाना बनत चालले असल्याने ते परिस्थितीचा आढावा घेऊन तात्पुरते बंद व्हावे, असे जनमानसात मागणी केली जात आहे.

Previous articleअहेरी विधानसभा मतदारसंघ मधील विविध समस्या सोडविण्या बाबत युवक काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना निवेदन सादर.
Next articleआकाशझेपने रक्तदानातून दिला मैत्रीचा संदेश