घुग्घुस पोलिसांनी केली अवैध दारूवर कार्यवाही करून 12 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

36

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून घुग्गूस -चंद्रपूर मार्गाने बल्लारशा कडे अवैध दारू घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती घुग्घुस पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळताच घुग्गूस- चंद्रपूर मार्गावरील शेणगाव फाट्याजवळ दि 2 जुलै ला दुपारी 2 वाजता दरम्यान सापळा रचला. ट्रक क्रमांक एम.एच.34/एम 5023 या वाहणाची थांबवून तपासणी केली असता देशी विदेशी दारूच्या 12 पेट्या आढळून आल्या. देशी विदेशी दारूची किंमत 1लाख 95 हजार व ट्रक किंमत 10 लाख असा एकूण 11 लाख 95 हजाराचा हजाराचा मुद्देम्माल जप्त करून ट्रक चालक सईद अहमद खान वय वर्षे 52 रा. रविंद्र नगर कारवा रोड बल्लारशा यास अटक केली.
सदर कार्यवाही पो. नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस गुन्हे शोध पथकाचे सचिन बोरकर, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, नितिन मराठे, ज्ञानेश्वर जाधव व सचिन डोये यांनी केली.