Home गडचिरोली अहेरी विधानसभा मतदारसंघ मधील विविध समस्या सोडविण्या बाबत युवक काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री...

अहेरी विधानसभा मतदारसंघ मधील विविध समस्या सोडविण्या बाबत युवक काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना निवेदन सादर.

174

 

दिपक बेडके प्रतिनिधी सिरोंचा
:सिरोंचा :- दिनांक 2 अगस्ट 2020 रोजी ला राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्या निमित्त सिरोंचा मुख्यालय येथे आले असता युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्गदर्शनात अहेरी विधानसभा अध्यक्ष आकाश परसा यांनी भेट घेऊन खलील मुद्यांवर पालकमंत्रीना निवेदन सादर केले.
1) अहेरी विधानसभा क्षेत्राचा हवा तसा विकास तसा अद्याप झालेला नसून या विविध समस्यांबाबत वेळोवेळी मंत्रीना व शासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्दा त्यांनी अद्यापही दखल घेतले नाही सिरोंचा तालुक्यातुन अहेरी व आलपली जोडल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 (c) ( सिरोंचा ते साकोली) तसेच सिरोंचा तालुका मुख्यालयापासून पातागुडम साठी जोडलेला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ( निजामबाद ते जगदलपूर ) या दोन्ही मार्गाचे सुधारणा करण्यात आली नसल्याने या दोन्ही मार्गवरून प्रवासी करणे म्हटले तर प्रवासींना व वाहन चालकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवासी करण्याची पाळी आली आहे. या दोन्ही मार्गाचे त्वरित सुधारणा करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी बऱ्याच वेळी केली असता सदर रस्त्याची सुधारणा करण्याबाबतीत शासन व प्रशासनाणे गांभीर्याने विचार केला नसल्याने आपण स्वतः पुढाकार घेऊन या दोन्ही मार्गाची सुधारणा करण्यात यावी. तसेच अहेरी विधानसभा मतदारसंघामधील अहेरी-भामरागड व अहेरी-एटापल्ली या राज्य महामार्ग असुन या मार्गावर आतापर्यंत खंडामय रस्त्यामुळे बरेच अपघात झाले असल्याने या मार्गावर प्रवास करण्याची पाळी वाहन चालक व नागरिकांनवर आली असल्याने या राज्य महामार्गाची तात्काळ सुधारणा करण्यात यावी अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित देण्यात यावी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयास त्वरित उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन रुग्णालयातील रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी पदाची भरणा करण्यात येऊन रिक्त असलेले `क्ष’ किरण तज्ञ पदही रिक्त असल्याने ते भरणा करण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात यावे. तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन दाखल झाली असून पण रेडिओलेझीस्ट पदाची भरती करण्यात आली नसल्याने ही मशीन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तरी पदाची भरणा करण्यात यावी व महिला तज्ञ डॉक्टर या पद रिक्त असल्याने गर्भवती महिलांना उपचारासाठी शेजारच्या तेलंगणा राज्याच्या मंचेरीयाल किंवा वरंगल या ठिकाणी धावपळ करावी लागत असल्याने त्या पदाची भरती प्रकिया तत्काळ करण्यात यावी. 3 अहेरी विधानसभा क्षेत्रात फक्त अहेरी येथेच रक्तपेढी असून अहेरी उपजिल्हा रुग्णालयापासून 105 किमी अंतरावर सिरोंचा ग्रामीण रुग्णालय आहे. तरी रक्तासाठी सिरोंचा येथील रुग्ण अहेरी येथे जाण्यास कमीत कमी 3 तास लागत असून रुग्णाची जीव मुठीत घेऊन अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठतात त्याकरिता सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे रक्तपेढी सेवा उपलब्ध करून द्याल तसेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात यावी व रिक्त पदांची भरती करण्यात यावी. 4 मागील अनेक वर्षांपासून सिरोंचा शहरातील भारतीय दूरसंचार निगम(बीएसएनएल) विभागाचे एकमेव मोबाईल टॉवर नेहमी बिघाड होत असल्याने या बाबत केंद्र सरकारला सुधारणा करण्याबाबत चर्चा करून योग्यती कारवाई करण्यात यावी. 5 सिरोंचा नगरपंचायत सिरोंचा हद्दीत भोंगळ कारभार असून रस्त्यांची कामे नीट केली जात नाही व कचरा व्यवस्थापन योग्य नाही . जनता नाराज आहेत अधिकारी यांना योग्य सूचना देण्यात यावी. 6 सिरोंचा शहर मुख्यालय पासून अगदी 19 किमी अंतरावरील वडदम पॉसील पार्क व 35 किमी अंतरावरील असलेला सोमनूर संगमच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करत या ठिकाणी पर्यटकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशी वरील मागन्या युवक काँग्रेस अहेरी विधानसभा अध्यक्ष आकाश परसा यांनी पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदना द्वारे दिली व परत त्यांची गडचिरोली जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या या वेळी युवक काँग्रेसचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष नवाज सायद, युवक काँग्रेसचे कार्यकर्ता हरीश बट्टी आदी उपस्थित होते.

Previous articleविद्युत शॉक लागलेल्या इसमाला बचावासाठी गेला आणि स्वतःच गतप्राण झाला
Next articleअदानी विज कारखाना बनत चालले ; कोविड रुग्ण कारखाना तरीपण नेमके प्रादुर्भाव करणारा कोण, हे अद्याप बेपत्ता, विरष्ठ अधिकारी, कर्मचारी सुस्त अदानी कामगाराने ने केले ३७ कोविड बाधीत अखेर मुंडीकोटा वैद्यकीय अधिका-याची समयसुचकता, सतर्कता उपयोगी