विद्युत शॉक लागलेल्या इसमाला बचावासाठी गेला आणि स्वतःच गतप्राण झाला

276

 

अतित डोंगरे दाखल न्यूज प्रतिनिधी

तिरोडा : घाटकूरोडा येथील युवक प्रवीण उर्फ बापू अशोक डोंगरवार वय २८ वर्ष हा विहीर बांधकामासाठी रोजनदारीने मरारटोला येथे गेला होता. बांधकामावरील राजू डोंगरवार यास विजेचा धक्का बसला हे समजताच त्याचे बचवाकरिता धावून गेला. राजूचे बचाव तो करू शकला. यात त्यालाही देखील शॉक लागला. तो स्वतःचे बचाव करू शकला नाही. त्याला तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. परंतु यातच त्याचे गतप्राण होऊन निधन झाले. सदर घटना दुपारी १२.०० वाजता दरम्यान घडली. कुटूंबात आई वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे.
प्रवीण अतिशय मनमिळावू आणि कोणाला मदत करण्याचे सवयीचा नवतरुण असल्याने घाटकूरोडा गावात शोककळा पसरली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची दखल तिरोडा ठाणेदार उद्धव डमाडे यांचे मार्गदर्शनात हवालदार रामटेके करीत आहेत.