Home कोरोना  24 तासात 55 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1881

24 तासात 55 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1881

262

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी(जिमाका) : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 55 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1881 झाली आहे. दरम्यान 47 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1299 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय 11, समाजकल्याण 11, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही दापोली 1, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 12, कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल मधील 12 रुग्ण आहेत.
*पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे*
रत्नागिरी- 20 रुग्ण
कळबणी – 17 रुग्ण
कामथे- 10 रुग्ण
दापोली – 3 रुग्ण
रायपाटण – 1 रुग्ण
देवरुख – 4 रुग्ण
कापडगाव, रत्नागिरी येथील 78 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 61 झाली आहे.
*तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे* .
रत्नागिरी – 15
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 12
चिपळूण – 12
संगमेश्वर – 7
लांजा – 2
राजापूर – 4
मंडणगड – 1
*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह – 1881
बरे झालेले – 1299
मृत्यू – 61
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 522
*संस्थात्मक विलगीकरण*
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 61, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 26, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -10, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 1, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 2, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 21,असे एकूण 121 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
*होम क्वॉरंटाईन*
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 22 हजार 716 इतकी आहे.
*16 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह*
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 18 हजार 509 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 023 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1881 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 16 हजार 130 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 486 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 486 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 02ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleभाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी सुर्यकांत साळुंखे यांनी निवड
Next articleविद्युत शॉक लागलेल्या इसमाला बचावासाठी गेला आणि स्वतःच गतप्राण झाला