Home महाराष्ट्र व्हाईट कॉलर सागवान तस्कर च्या वनविभागाने केला पर्दाफाश व्यवसाय डॉक्टरीच्या धंदा मात्र...

व्हाईट कॉलर सागवान तस्कर च्या वनविभागाने केला पर्दाफाश व्यवसाय डॉक्टरीच्या धंदा मात्र तस्करीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील रुग्णवाहिकेच्या सागवा न तस्करी करताना वैद्यकीय अधिकारी पति चालकास पकडले वनविभागाने आर एफ ओं कदम यांची कारवाई

208

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी:-( तालुका प्रतिनिधी) (दिनांक 2 ऑगस्ट 2020) तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील रुग्णवाहिकेत सागवनच्या लाकडाची तस्करी करताना महिला वैद्यकीय अधिकारी व तिचा पती व रुग्णवाहिकेच्या चालकास वन अधिकारी कदम व त्यांच्या पथकाने सापळा रचून विभागाच्या वनविभागाच्या हद्दीत मुद्देमालासह पकडले असल्याने आरोग्य खाते खळबळून जागे झाले पारशिवनी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र असून नवेगाव खैरी प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी जंगलात जंगलव्याप्त क्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करतो जंगल व्याप्त क्षेत्रातील आरोग्य सेवा तत्पर व्हावी याकरिता आरोग्य विभागाची रुग्णवाहिका 24 तास चालक सह सेवेत असते पण अति लोभापायी या रुग्णवाहिकेचे मधून जंगलातील सागवान वृक्षाची चोरटी कत्तल करून पाट्या रुग्णवाहिकेतून तस्करी करण्याचा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पती आनंद वाघधरे रुग्णवाहिका चालक प्रकाश सावरकर यांना सांगवना च्या पाट्या सह वन विभागाचे वन आधिकारी कदम व चमूने वन विभागाच्या कार्यक्षेत्र तच सापळा रचुन रुग्णवाहिका सह पकडून ०हाईट कॉलर सागवान तस्करीचा पर्दाफाश केला
रुग्णवाहिका क्रमांक एम एस ३१ ,७३५३या रुग्णवाहिका मध्ये बसून डॉक्टर महिला व त्याच्या पती चालक हे ०१ऑगस्त २० शनिवारच्या रात्री अंदाजे दहा१० वाजता दरम्यान वनविभागात गेले शीलादेवी वन विभाग तपासणी नाक्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका असल्याने जास्त विचारपूस न करता जंगलव्याप्त क्षेत्रात प्रवेश दिला रात्री अंदाजे (११.३०)साडेअकरा वाजता परत येत असताना अंबाझरी पॉईंट वर रात्रीची गस्त करत असताना वन अधिकारी कदम आपल्या कर्मचारी सह असताना त्यांनी सदर रुग्णवाहिका थांबवून थांबवून तपासणी केली असता रुग्णवाहिका मध्ये सागवानाचे पाट्या ठेवलेल्या दिसताच गाडीमध्ये असलेल्या महिला डॉक्टर डॉक्टर शिला पाजारे व त्याच्या पती आनंद वाघधरे व चालक प्रकाश सावरकर यास विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यानुसार वन आधिकारी आर एफ ओ कदम यांच्या लक्षात आले की तस्करीच्या मामला आहे तात्काळ रुग्णवाहिका जप्त करून मुद्देमाल हस्तगत करून वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली
डॉक्टर रवि शेंडे यांनी सांगितल्याप्रमाणे हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी असुन डॉक्टर शिला पाजारे व रुग्णवाहिका चालक त्यांच्या औधिनिष्ठ काम करतात त्यांच्या मते रात्री केव्हा कुठे गेली कशासाठी गेली याची मला काहीच कल्पना नसून मी झोपी गेलो होतो असे सांगितले मला घटनेची माहिती आज सकाळी कळली असे स्पष्ट केले चालक डॉक्टर हे जर रुग्ण घेऊन किंवा आणण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यासोबत आरोग्यसेविका किंवा सेवक असणे आवश्यक असते याबाबत रुग्णवाहिकेत लाग बुक असते त्या सर्व बाबी लिहिल्या जातात हे विशेष तरीही मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेंडे यांना याबाबत सूचना देणे बंधनकारक असते मात्र हे प्रकरण आता तरी गंभीरपणे घेऊन आरोग्यसेवेचे धिडवड़े निघणार न नाही याकरिता सहकार्य करून आरोपी पाठीशी घालणे अंजगंड येऊ शकते
पाराशिवनी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघ- प्रमाणे यांनाही प्रकरण गांभीर्याने घेत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देणे देऊन चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले तालुक्यात कॉबिड् रुग्ण वाढत असल्याने आम्ही रात्रंदिवस सेवा देत आहोत पण या घटनेत घटनेने या घटनेने मी फार दुखी झालो असल्याचे स्पष्ट सांगितले

लाक डाऊन तस्करी करिता घेतला पुरेपुर फायदा – कोरोना महामारी वर अंकुश लावण्याकरिता शासनाने मार्च महिन्यापासून सुरू केले असून लॉकडाऊन सुरू केले यादरम्यान मात्र आरोग्यसेवा २४ तास सुरू ठेवून कोविद रुग्ण किंवा इतर रुग्णांना प्रभावी आरोग्य सेवा मिळावी म्हणून बिना रोखठोक धावण्यास मुभा होती त्याचे पुरेपूर लाभ घेऊन सदर आरोपी रुग्णालय ऐवजी रुग्णवाहिकेच्या सागवान तस्करी करिता सुपीक डोक्याच्या वर वापर करून वन विभाग व पोलिसांना गुंगारा देऊन जंगलातून सागवानाची शहराकडे तस्करी करीत होते हे या घटनेतून स्पष्ट होते कारण अत्यावश्यक सेवा मुळे रुग्णवाहिकेत कोणीही थांबवत नाही हे याचा लाभ घेऊन तस्करी सुरू असल्याचे अंदाज आहे
वन आधिकारी कदम -यांचे माहितीनुसार वन अधिकारी कदम यांनी चौकशी सुरू करून आतापर्यंत किती तस्करी झाली, माल कुठून आणला ,कोणी दिला, कुठे नेत होता, किती वेळ नेला, या सह अनेक बाजूने चौकशी सुरू केली या तस्करीत मोठे मासे आहेत का?
असा प्रकारे चौकशी करून आपण गुन्हाच्या कलमात वाढ करणार असल्याचे सांगितले
सदर रुग्णवाहिका पाट्या व आरोपी वन विभागाच्या स्वाधीन असून चौकशी सुरू असल्याचे कळले
*एक हात मे दंडा -दुसरे हात मे प्यार -तुझे क्या चाहिये बतामेरेयार* या घोषवाक्य ने वन अधिकारी कदम कार्य करीत असून जंगल संपत्तीचे रक्षण करण्यास व कर्तव्य बजावण्यास बजावण्यास रात्री सुद्धा छुप्या मार्गाने गस्त करीत असतात त्यांच्या कार्यशैलीसेवेमुळे आज वाईट कॉलर सांगावन तस्करीच्या सागवान तस्करी च्या पर्दाफास करण्यास यश आले हे विशेष

Previous articleवीज पडून जखमी झालेल्या रुग्णांची जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व पंचायत समिती अहेरी सभापती श्री भास्करभाऊ तलांडे यांनी रुग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Next articleभाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी सुर्यकांत साळुंखे यांनी निवड