वीज पडून जखमी झालेल्या रुग्णांची जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व पंचायत समिती अहेरी सभापती श्री भास्करभाऊ तलांडे यांनी रुग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

122

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

अहेरी :- तालुक्यातील चिंचूगुंडी गावामध्ये कापसाच्या पिकाला औषधी टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांवर काल दुपारी 2.30 वाजता च्या सुमारास वीज कोसळून 1 जागीच ठार तर 9 जण जखमी असून त्यांच्या वर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मजुरांनी दुपारी औषधी टाकून जेवण करून विश्रांती घेत होते, दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झालं, पावसापासून बचाव करण्यासाठी आंब्याच्या झाडा जवळ जाऊन उभे होते, तेंव्हाच विज कोसळल्याने १ जण जागीच ठार झाली अन्य मजूर जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
यामध्ये पोसक्का चिन्ना तोटावार वय 35 रा. चिंचूगुंडी यांचं जागीच ठार झाल्या, जखमींमध्ये अरविंद मल्लेश गुम्पा वय 8 रा रेगुंटा, लक्ष्मी मलेश गुम्पा वय 40 रा रेगुंटा, गणपत नागना कुमराम वय 38, सारका लचमा पानेम वय 15, नागुबाई बापू पानेम वय 22, वैशाली लिंगा तोटावार वय 18, सुनीता श्रीकांत टेकुलवार वय 25, स्नेहा शंकर पानेम वय 17, मलेश्वरी शंकर पानेम वय 35 सर्व जण चिंचूगुंडी येथील रहिवासी होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार काल गडचिरोलीत होते त्यामुळे आज अहेरीत आले असता त्यांनी अहेरी येतील उपजिल्हा रूग्णालयात भेट देवून जखमी रुग्णाची विचारपूस केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,प्रशांत गोडसेलवार,गणेश नागपूरवार,राकेश सड़मेक आदि उपस्थित होते.