सिरोंचा रुग्णालयात रक्तपेढी उपलब्ध करून ध्या – टायगर ग्रुप सिरोंचा यांची मागणी

176

 

दिपक बेडके प्रतिनिधी सिरोंचा
आज दिनांक 2 ऑगस्ट 2020 ला राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज दुपारी 1 वाजता सिरोंचा मुख्यालय येथे आले असता,टायगर ग्रुप सिरोंचा चे प्रमुख विशाल मादेशी, विष्णू कोमरे, मनोज मादेशी यांनी पालकमंत्री साहेबांना सिरोंचा मुख्यालय येथे, रक्त पेढी (ब्लड बैंक ) उपलब्ध करुन देण्यास निवेदन सादर केले.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे ब्लड बैंक आहे सिरोंचा मुख्यालय पासून 120 कि. मी. अंतरावर असल्यामुळे आकस्मिक रुग्णासाठी त्वरित सेवा पुरविणे अवघड जाते अश्या वेळी नाईलाजास्तव रुग्णाला तेलंगाना येथील दवाखान्यात पाठवावे लागते रुग्णास, नाहक त्रास व आर्थिक नुकसान सोसावे लागते त्या करिता सिरोंचा येथील टायगर ग्रुप कडून जिल्ह्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन देण्यात आले.