निसर्ग संपदा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्याला चालना देण्याची आवश्यकता:-पालकमंत्री एकनाथ शिंदे अहेरी येथील राजवाड्याला दिली भेट

 

गुड्डीगुडम प्रतिनिधी / रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- कालपासून गडचिरोली जिल्ह्याचा दौऱ्यावर असलेले नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहेरी येथील राजवाड्यात भेट आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेतली.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना निसर्ग संपदा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्याला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
गडचिरोली जिल्हा हा वनसंपदेने नटलेला असून याठिकाणी बांबू,मोहा,तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात आहे.जिल्ह्याचा विकास करायचे असेल तर चालना देणे आवश्यक असून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जिल्ह्याच्या विकासासाठी चर्चा करून मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणू असेही यावेळी त्यांनी म्हटले.
आज ते सकाळी जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर वसलेल्या आणि तीन राज्यांची सीमा एकत्र असलेल्या सिरोंचा तालुक्याला भेट देऊन विविध ठिकाणी भेट दिली.दुपारी तीन वाजता प्राणहिता पोलीस उपमुख्यालय येथे भेट देऊन सरळ राजवाड्यात आले.याठिकाणी लोकांचे निवेदन स्वीकारून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर आलापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या कोविड सेंटर ला भेट देऊन गडचिरोली कडे निघाले.
राजवाड्यात भेट दिले यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम,राकाचे महिला जिल्हा कार्यध्यक्ष शाहीन भाभी हकीम,जिल्हाधिकारी दीपक सिंगला,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,तहसीलदार ओंकार ओतारी,उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई,अहेरी चे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.