बकरी ईद निमित्त महसूल व पोलिस प्रशासनाचा अगळा वेगळा उपक्रम- एक झाड एक फूल देऊन दिली ईदच्या शुभेच्छा

151

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

संपूर्ण देश कोरोना महामारी सुरु आहे कोरोना ला हरविण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आलेले आहे केंद्र व राज्य सरकार जनतेच्या सुरक्षेसाठी वारंवार जनजागृती करत आहे. प्रशासनाने मुस्लिम समाज बांधवांची असणारी रमज़ान ईद ही घरी साजरी करा असे आदेश निर्गमित केले होते. आता प्रशासनाने ही बकरा ईद घरी साजरी करा ही पूर्णपणे नियम पाळुन ईद साजरी केली,
बकरा ईद निमित्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे अकोट चे नायब तहसीलदार राजेश गुरव अकोट शहर पो. स्टे. चे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, मुफ़्ती आबिददुर रहेमान कासमी व अक्षय पाटील यांनी मुस्लिम धर्मगुरु व सामाजिक लोकांशी भेट घेऊन एक झाड़ एक फूल असल्या प्रकारचा अगळा वेगळा उपक्रम राबवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. आणि आंबोळी वेसच्या मुस्लिम कब्रस्तानात वृक्षारोपण करण्यात आले कोरोना महामारी सुरु असतांना नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी रमजान ईद पुढाकार घेऊन रमजान शिरखुरमेंचा किड्स देऊन एक माणुसकी जपली होती.
मुस्लिम धर्मगुरु यांनी आपल्या समाजात कोरोना बाबत जनजागृती केली असून शासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून सहकार्य करत आहे.या ईद निमित्याने भेट घेऊन आपला सर्वांचा कोरोना ला हरविण्यासाठी सतत प्रयत्न असून योगदान देत आहे याकूब पूरा येथील दर्गा वर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ठाणेदार संतोष महल्ले अकोट नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सै.अकरम साजिद खान पठान न. पा. शाळेचे मुख्याधापक सय्यद जाहिर निसार शेख सय्यद मनवर अली आर सी पी चे प्रमुख चंद्रप्रकाश सोळंके बदरूद्दीन सय्यद हैदर अली सै. तनवीर इशांत ठाकुर सै.अजमल सै. नादिम सै.सोहेल यांनी दर्गावर चादर चढ़वून एक माणुसकीचा परिचय दिला.