सोनाई कारखाना दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार – माजी सभापती आरोग्य व बांधकाम विभाग प्रविण भैया माने

 

नीरा नरसिंहपुर दिनांक 2 प्रतिनिधि बाळासाहेब सुतार.

सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याचे यंदाच्या गाळप हंगामासाठी रोलर पूजन संपन्न.

आपल्या सोनाई कृषी प्रक्रीया कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शुभारंभासाठी कारखान्यामध्ये रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक तसेच मा. आरोग्य व बांधकाम विभाग सभापती तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या शुभहस्ते रोलर पूजन पार पडले.

“सोनाई परिवाराचे संस्थापक दशरथदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा हा कारखान्याचा१४ वा गाळप हंगाम. या हंगामात कारखान्याने दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट बाळगले असून, त्यासाठी आवश्यक उस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती, यावेळी प्रविण माने यांनी या रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी दिली.

शेतकरी बांधवांना योग्य तो हमीभाव देण्यासाठीची सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याची जी परंपरा आहे, त्यात अजिबात खंड पडणार नाही हा विश्वास यावेळी प्रविण माने यांनी यावेळी व्यक्त केला.

यावर्षी उसाचे उत्पन्न जास्त प्रमाणावर झाले असल्याने, या गाळप हंगामासाठी कारखान्यात युध्दपातळीवर कामे सुरू असून, सर्व विभागाची कामे चालू करण्याच्या दृष्टीने दिशेत कार्य प्रगतीपथावर असून, लवकरच या हंगामाचा श्री गणेशा करण्यात येणार असल्याचे माने यांच्यावतीने सांगण्यात आले.

आजच्या या रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी, अभिमान करे, योगेश देवकर ,कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भुंजकर, मुख्य अभियंता श्री सुभाष काळे, उमेश ननवरे ,रामहरी माने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160