कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याची समविचारींची मागणी

0
97

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात ४३ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून मागील ३ महिने त्यांना वेतन अदा करण्यात आलेले नाही.ही बाब गंभीर असून कोरोना महामारीच्या काळात जीवाची बाजी लावणाऱ्या या डॉक्टरांना तातडीने वेतन अदा करावे अशी मागणी सिंधुदुर्ग समविचारी मंचचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास आजगांवकर यांनी केली आहे.
कोरोना भीषण संकटात राबणा-या हातांना वेतन नाही ही बाब गंभीर असून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी.आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणाचा पाढा आपण सबंधित यंत्रणेकडे शासकीय पोर्टलच्या माध्यमातून मांडत असून लक्ष वेधीत असल्याचे आजगांवकर यांनी म्हटले आहे.

दखल न्यूज भारत