दर्यापूर तालुक्यात मुगाच्या पिकाचे तिन तेरा, बळीराजा हैरान, शासनाने तात्काळ मदत करावी, ऍड संतोष कोल्हे

316

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
चालू हंगामी वर्षात दर्यापूर तालुक्यात अनेक बळीराजांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले त्यामुळे बळीराजाची फारच दैनावस्था झाली आहे अश्यातही योग्य वेळेवर अनेकांना आवश्यक ती खते मिळाली नाही तशाही परिस्थितीत तालुक्यातील बळीराजाने मेहनतीने पेरणी केली त्यासाठी अतोनात खर्च करुन वेळप्रसंगी स्वताचे दुखणे बाजूला सारून मुगाच्या पिकाची पेरणी करुन लेकराप्रमाणे संगोपन केले
***तालुक्यात मुगाच्या पिकावर कोणत्यातरी रोगाने अचानक आक्रमण केले त्यात मुगाचे पिक भुईसपाट झाले व पिकाची धूळधाण झाली बळीराजा पार मोडला गेला असे असताना शासन व प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसले आहे
***जनतेने मोठया विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीसुध्दा गप्प बसले आहेत एरवी बळीराजाबाबत जिव्हाळा दाखवून मतांची भिक मागणारे चोर कुठे लपलेत, महामारीच्या काळात बळीराजावर मुगाचे पिक भस्म संकट आले असतानाच जनतेचे सेवक असलेले लोकप्रतिनिधी मात्र शेपूट घालून घरात बसले आहेत
शासनाने मुगाच्या पिकाचा तात्काळ सर्व्हे करुन व्यथित झालेल्या बळीराजाला विनाविलंब नुकसानभरपाईची मदत देणात यावी अन्यथा कठोर जनआंदोलन तथा आत्मक्लेश करण्यात येईल असा इशारा दर्यापूर नगरपरिषदेचे नगरसेवक ऍड संतोष कोल्हे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून दिला आहे