जिल्ह्यात आढळले रेकॉर्ड ब्रेक ६० पॉझिटिव्ह रुग्ण क्रियाशील रुग्ण संख्या १४६ एकूण ३८६ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तहसीलदार डी.एस.भोयर नी दिली चिरचाडबांध गावाला भेट..

0
234

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत…।।
गोंदिया दि.2 मागील काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अलीकडे काही दिवसात बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने जिल्हा कोरोना विस्फोटाकडे जात आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे.३१ जुलै रोजी १४ रुग्ण आणि १ ऑगस्ट रोजी ३३ रुग्ण आढळल्यानंतर आज २ ऑगस्ट रोजी रेकॉर्ड ब्रेक ६० कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोना क्रियाशील असलेल्या रुग्णांनी शतक गाठले असून क्रियाशील रुग्ण १४६ झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे आज गोंदिया येथील प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत ३८६ कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे. क्रियाशील रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. २३० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

आज आढळून आलेल्या ६० रुग्णांपैकी सर्वाधिक ३८ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे.अदानी पॉवर प्रोजेक्टमधील १९ कामगार पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तिरोडा येथील गांधी वार्ड येथील एक रुग्ण, मुंडीकोटा व बेलाटी/खुर्द येथील प्रत्येकी पाच, वडेगाव,पिपरिया, गोंडमोहाडी,पाजरा,पालडोंगरी,पाटीलटोला,काचेवाणी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

गोंदिया तालुक्यात आज दहा रुग्ण आढळले असून चार रुग्ण हे गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीतील आहे. एक रुग्ण कुंभारेनगरचा,एक रुग्ण गोशाळा वार्डचा असून हा रुग्ण भोपाळ येथून आलेला आहे.एक रुग्ण सेजगाव येथील असून तो पंजाब येथून आलेला आहे. मुंडीपार येथे आढळून आलेला एक रुग्ण हा तेलंगाना येथून आलेला आहे. दोन रुग्ण हे मध्यप्रदेशातील बालाघाट येथून उपचारासाठी गोंदियात आलेले आहे.

देवरी तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये परसटोला,भागी,पुराडा व देवरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथे दोन रुग्ण, सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण असून तो छत्तीसगड येथून आलेला आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून दोन रुग्ण हे वडेगाव येथील तर तीन रुग्ण अर्जुनी/मोरगाव येथील आहे.

आज आढळून आलेल्या ६० रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता ३८६ वर पोहचली आहे.त्यामुळे क्रियाशील रुग्ण संख्या १४६ झाली आहे.

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू प्रयोगशाळेत आजपर्यंत तपासणीसाठी एकूण ९६२४ नमुने पाठविण्यात आले. यातील ९०४६ नमुने निगेटिव्ह आढळले तर ३६९ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. ७१ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे. १३८ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे.

जिल्ह्यातील चार कोरोना बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदिया येथील प्रयोगशाळेतून ३६९ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून तेरा असे एकूण ३८६ बाधित रुग्ण आढळले आहे.

जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १९२ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ७९२ व्यक्ती असे एकूण ९८४ व्यक्ती विलगिकरणात आहे. ह्या सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर उपचार करीत आहे.

जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा तात्काळ शोध हा रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४९३ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये २४८० अहवाल निगेटिव्ह आले आहे. १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ७२ चमू आणि ३० सुपरवायझर ३० कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.

जिल्ह्यातील ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.जिल्ह्यात असे ३० क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला, कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,सिव्हिल लाईन.रेल्वे लाईन,श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाउलदौना,रामाटोला व तितेपार. देवरी तालुकयातील देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,८,९,१० आणि आखरीटोला व गरवारटोली.सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा व पाटेकुर्रा.गोरेगाव तालुक्यातील घोटी आणि तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा,तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड व न्यू बेलाटी/खुर्द.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी व वडेगाव आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आणि चिरचाळबांध आदी गावे आणि वार्डचा या कंटेनमेंट क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काळजी घ्या
अंतर ठेवा
मास्क बांधा
सुरक्षित राहा