प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक
ब्रम्हपुरी :– अखिल भारतीय किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या दि 10 जुलै ते 5 सप्टेंबर 2020 या दरम्यान देशव्यापी संयुक्त जनसंपर्क मोहीम कार्यक्रम अंतर्गत ब्रम्हपुरीत किसान कामगार नेते कॉ. विनोद झोडगे व त्याचे सहकारी सातत्याने तालुक्यातील संपूर्ण गाव पिंजून काढत शेतकरी, शेतमजूर यांच्या भेटी घेणे त्यांना माहिती पत्रक वाटप करून त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम आहे.
दि 1 ऑगस्ट 2020 रोजी मौजा चोरटी, भगवानपूर व वायगाव येथे भेट दिली असता अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगत थेट शेतावर घेऊन गेले असता गेल्या 20 दिवसा पासुन पावसाने दांडी मारल्याने शेतातील संपूर्ण आवत्या व धान पऱ्हे पूर्णतः सुख लेली आहेत ज्यांचे थोडेफार रोवने झाले ते सुद्धा करपत आहेत, त्यामुळे रोवनि कशी करायची हा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तेव्हा या परिसरासह तालुक्यातील इतर गावात प्रशासनाने तातडीने सर्वे करून, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी किसान सभेचे नेते कॉ विनोद झोडगे व शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वाधिक संकट शेतकऱ्यांनवर ओढवले व त्याचे हाल बेहाल झाले आहेत. या पूर्वी सुद्धा बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल वेळेवर विकता आला नाही. अनेक शेतकऱ्यांचा माल शेतातच सडला अथवा नष्ट करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही, बँकेच्या चुकीमूळे अनेक पुनरगठीत शेतकरी कर्जमाफी लाभा पासुन वंचित आहेत. शासनाची तूटपुंजी मदत शेतकऱ्यांन पर्यंत पोहचलीच नाही. शेतीमालाच्या भावाची हमी नाही. वेळेवर लाईन नाही, मात्र वीजबिल अवाढव्य,अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला च नाही, त्यामुळे शेतकऱ्यांन ची अवस्था वाईट आहे.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट लक्षात घेता शासन व प्रशासन यांनी गंभीर दखल घेत तालुक्यातील नुकसान झालेल्या धान पिकांचे तातडीने सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियन च्या वतीने 10 आगस्ट रोजी ब्रम्हपुरी SDO कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉ विनोद झोडगे, विनोद राऊत, मिलिंद भन्नारे, शालिक ननावरे, राजेश खरकाटे, मुखरु रामटेके, विनोद गेडाम, रामाजी ढोरे, जयराम ढोरे, महादेव बघमारे, राजेंद्र ठाकरे, कैलास ढोरे, दिवाकर राऊत, रमेश भागडकर, भोजराज ढोरे, गोवर्धन राऊत, उद्धव कोरवाते, मारोती बुल्ले, लक्समन ढोरे, भाऊराव मारबते आदी नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.