गडचिरोली जिल्हयात आज 12 कोरोनामुक्त

151

 

संपादिका रोशनी बैस

गडचिरोली,(जिमाका)दि.02: जिल्हयात आज सीआरपीएफ, गडचिरोली येथील 9 तर भामरागड येथील 3 असे एकूण 12 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर एक स्टाफ नर्स आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 170 झाली. तर एकुण बाधित संख्या 607 झाली. आत्तापर्यंत एकूण 436 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.