स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थांना एच्छिक परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी द्या – आ. किशोर जोरगेवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

129

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातून पुणे, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद येथे गेलेले विद्यार्थी आता स्वगृही परतले असतानास राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी जिथे तयारी करत होते तेच केंद्र निवडले असल्याने आजची स्थिती बघता परीक्षा केंद्र गाठणे या विद्यार्थ्यांना शक्य नाही. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता या विद्यार्थांना एच्छिक परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी राज्यभरातून युवक मोठ्या संख्येने पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, नागपूर येथे गेले होते. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगातर्फे निघालेल्या भरतीचे अर्ज सादर करुन जिथे वास्तव्यास होते, तेच परीक्षा केंद्र टाकले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक टाळेबंदी करण्यात आली. परिणामी सतर्कता म्हणून सर्वजण स्वगृही परतले आहे. त्यातच आता लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्र जाहीर केले. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ११ आॅक्टोबर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र कोरोनाची सध्यास्थिती बघता व प्रवासी साधनाचा विचार करता सदर परीक्षा केंद्र गाठणे विद्यार्थ्यांसाठी शक्य नाही. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती सदर विद्यार्थाना सतावत आहे. अश्यात स्पर्धा परीक्षेची तयारीकरिता विदयार्थ्यांनी केलेले परिश्रमही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ४ आॅक्टोबर रोजी सिव्हील सर्व्हिसेस व फॉरेस्ट सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता परीक्षा केंद्र बदलविण्याची मुभा देण्यात आली आहे. याच पार्शवभूमीवर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यर्थ्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांनाहि परीक्षा केंद्र बदलविण्याची मुभा देत त्यांच्या सोईचे केंद्र निवडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सदर पत्राच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.