अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
सततच्या अतिवृष्टीमुळे पोहरा पूर्णा ता भातकुली येथील शेतशिवारातील जमिनी खरडून गेलेल्या आहेत यात शेतातील सोयाबीन तुर कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे
लॉकडाऊनमुळे शेतकरीवर्ग आधीच हवालदिल झाला आहे कर्ज करुन बि बियाणे, पेरणीची तरतूद केली शेतकरीवर्गाच्या शेतातील पिक हे चांगल्या प्रकारे शेतात डोलत असतानाच निसर्गाच्या अवकृपेने शेतातील पिक जमीनदोस्त झाल्यामुळे आता शेतकरी वर्गाला मोठया संकटाचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना या अस्मानी सुल्तानी संकटातून बाहेर काढण्याकरिता नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे