श्री जगदंबा शाळेच्या शिक्षकांनी मुस्तफा सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा – माजी उप नगराध्यक्ष राजकुमार भोपी

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे)

माहुर येथील श्री जगदंबा विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक हाजी शेख मुस्तफा सर यांना दि.31 जुलै रोजी सेवा निवृत्तीमुळे आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी बोलतांना संस्थेचे सहसचिव तथा माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी म्हणाले की शांत,संयमित स्वभावाच्या मुस्तफा सरांनी आपल्या 39 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात केवळ विद्यार्थी घडविण्याचाच ध्यास घेतला,त्यासाठी अथक परिश्रमही घेतलेत.त्याचे संस्थेतील अन्य शिक्षकांनी अनुकरण केल्यास अनेक विद्यार्थ्यांचे जिवन तर घडेलच शिवाय संस्थेचीही अधिक प्रगती होईल अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यादानासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.संस्थेच्या वतीने अध्यक्ष जयकुमार भोपी यांच्या हस्ते शेख मुस्तफा सरांचा शाल श्रीफळ व आहेर देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभ कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा.भगवानराव जोगदंड पाटील यांनी मुस्ताफा सरांच्या अनेक आठवणीना उजाळा देवून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची उपस्थितांना माहिती दिली. उर्दू विभागाचे शेख फारूक सर यांनी जेव्हा जेव्हा कार्यालयाला आवश्यकता भासली त्या – त्या वेळी सरांनी कसल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता कार्यालयाला व महाविद्यालयाला सहकार्यच केल्याची आठवण ताजी केली.निवृत्ती पर्यंत विद्यार्थी हीत हेच ध्येय मुस्तफा सरांनी बाळगले असे मत अंजली झरकर यांनी व्यक्त केले.
निरोप समारंभाचे
सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक विश्वासराव जाधव पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.व्ही. शिंदे पाटील यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे तंतोतंत पालन केले होते.