खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढ दिवसा निमित्त तालुका भाजपाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे )

भाजपा नेते तथा नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील यांचा आज दि.2 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे.या दिवसाचे औचित्य साधून भाजपाचे युवा नेते अॅड.रमण जायभाये यांच्या संकल्पनेतून माहूर तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक शालांत परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्षस्थळी जाऊन सत्कार करण्यात आला.
अॅड. रमण जायभाये,भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर, विजय आमले,देवकुमार पाटील,संजय पेंदोर,साईनाथ नागरगोजे,रामकिसन केंद्रे,कैलाश फड,हर्षद दीक्षित,पद्मजा गी-हे यांचेसह तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या कु. धनश्री विनायक काण्णव, रोहित दीपक मोहिते, कु. अल्फिया तेहमाज शेख इब्राहिम, प्रमोद मोबिल पवार माहुर यांचेसह विशाल समाधान चोले, परसराम लक्ष्मण घुले (टाकळी ), कु. जागृती रोहिदास राठोड (लखमापूर ),
कु. समृद्धी दिलीप ताटेवार (गोकुळ गोंडेगाव ), कु. निकिता दालपे (मदनापुर )
,सिद्धांत कंधारे,रोहन सुनील दळवे (वाई बाजार ), शिवशंकर सुरेश मुंडे, विजय गणपत राठोड ( वझरा ), दिनेश सुजित पवार, रचित शरद राठोड,
रुद्रेश्वर उल्हास पवार (पालाईगुडा )
करण सुरेश जाधव (वानोळा ),
वैभव एकनाथ चोले ( पावनाळा ), रामकिशोर भाऊराव डुकरे ( अनमाळ )कु. आशा अशोक शिंदे कु. सुचिता चव्हाण (हडसणी ),कु. प्रणिता खंडू किरवले( कुपटी ) व विशाल गजानन नरवाडे (आष्टा )या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सन्मान पत्र देवून त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढ दिवस साजरा केला.