भरधाव ट्रकने दुचाकी स्वारास चिरडले.पलाईगुडा फाट्यावरची दुर्दैवी घटना.

242

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे )

माहूर कडून किनवट कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच. ३2 क्यू.४८०४ या क्रमांकाच्या ट्रकने पालाईगुडा फाट्यावर दुचाकीला जबर धडक देवून चिरडल्याने गंगाराम मेघा राठोड ( वय ५० वर्षे ) रा.वानोळा या इसमाचा जागीच मृत्यू झाला.सदरची दुर्दैवी घटना दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ :३० ते ८:०० वाजण्याचे दरम्यान घडली.
गंगाराम राठोड हा गंगाजीनगर-करंजी येथील भाजीपाला बीट मधून भाजीपाला आणण्यासाठी जात असताना काळाने त्याचेवर झडप घातली.त्याच्या अपघाती मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. माहिती मिळताच सिंदखेड पोलीस स्टेशनचे स.पो.नि.मल्हार शिवरकर यांनी घटणास्थळी धाव घेवून पंचनामा केला.मयत गंगाराम हा भाजी पाल्याची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता.