गोंदिया जिल्ह्यात आज सर्वाधिक 60 रुग्ण,तिरोड्यात 33

150

 

प्रतिनिधि // कुंजीलाल मेश्राम

गोंदिया,दि.02ः- गोंदिया जिल्ह्यात आज रविवारला(दि.02) एकाच दिवशी आजपर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून 60 एवढी संख्या आहे.आता एक्टीव्ह रुग्णांची संख्या 157 वर पोचली आहे.यात तिरोडा तालुक्यातील 33 रुग्णांचा तर गोंदिया तालुक्यातील 20 रुग्णांचा समावेश आहे.देवरी 4,आमगाव 2 व गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यातील बयवाडा,चुल्हाड,खैरबोडी,खातीटोला(दवनीवाडा),लाखेगाव, माल्ही(गांगला),मांडवी, गुमाधावडा,मेंढा,मुरपार,सतोना,सेजगाव(एकोडी),उमरी,वडेगाव,अर्जुनी,उसर्रा, व मुंडीकोटा या गावातील काही रुग्ण पाझिटिव्ह आढळलेले असून हे सर्व अदानी पाॅवर प्रोजेक्टमध्ये कामावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली.गोंदिया जिल्ह्यात 1 आॅगस्ट रोजी 33 रुग्ण आढळले होते.तर 31 जुर्ले रोजी 14 रुग्ण आढळले होते.दिवसेदिवंस रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.सायकांळपर्यंत या आकडयात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,कारण अधिकृतरित्या अद्याप आकडे जाहिर झालेले नाहीत.